मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुर्ला विधानसभेतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना दिली भेट

मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुर्ला विधानसभेतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना दिली भेट

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी काल कुर्ला विधानसभेतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन आई भवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले व मोठ्या संख्येने उपस्थित भक्तगणांसोबत संवाद साधला.

यात शिवसम्राट प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाला भेट दिली त्यानंतर चुनाभट्टी येथील मुंबईची जगदंबा आई, प्रेम नगर स्पोर्ट्स क्लब, जय अंबे नवरात्रोत्सव मंडळ, नवीन म्हाडा संकुल सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्या विराजित अंबा मातेचे दर्शन घेतले. तसेच माजी नगरसेवक श्री. विजय तांडेल यांच्या प्रभागातील माँ जगदंबा मित्र मंडळ, चुनाभट्टी येथील देवीचे दर्शन घेतले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *