कुर्ला (प.) ताकिया वॉर्ड चुनाभट्टी चाफेगल्ली येथील कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठा बाबत बृहन्मुंबई महानगपालिकेच्या जल अभियंता श्री. पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्या समवेत बैठक घेण्यात आली. यावेळी पाण्याच्या वेळ संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी जल अभियंता यांनी तत्काळ निर्देश देऊन दत्तगुरू लेन येथे तपासणी करीता पथक पाठविले अशा प्रकारची तपासणी जगो जागी करून २ ते ३ दिवसात पाहणी करून पाण्याचा दाब वाढवण्याच्या तसेच वेळेत बदल करण्यात दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित केले. यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.