मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक

पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत सहभाग घेऊन कुर्ला विधानसभेतील खाली मांडलेली विविध विकास कामांसंदर्भात पाठपुरावा करण्यात आला.
• माझ्या कुर्ला विधानसभा मतदार क्षेत्रातील रेल्वे हद्दीतील असेलेल्या संतोषी माता नगर , साबळे नगर व क्रांती नगर येथे अनेक वर्षे जुन्या असलेल्या झोपडीधारकांना कोणताही पर्यायी जागा न देता रेल्वे प्रशासना मार्फत नोटीस बजावण्यात येत आहे. सदरहू रहिवाशी अनेक वर्षे येथे राहत आहेत त्यांचा त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने धोरण होणे खूप गरजेचे आहे.याबाबत आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून सदर झोपडीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी हि विनंती.
• हशू अडवाणी चौक येथे पूर्वी वाहनांना फिरण्य करिता सर्कल होता परंतु गेली २ वर्षे सदरहू सर्कल बंद करण्यात आलेला आहे. सद्यस्थिती मेट्रो-४ कामामुळे कुर्ला सिग्नल मधून यु-टर्न बंद आहे या कारणाने खूप वाहतूक कोंडी होत आहे. तरीही तज्ञांचे मत घेऊन सदरहू जंक्शन सुधारणा कशी करण्यात येईल व याठिकाणी यु-टर्न कसा करता येईल यावर विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.
• स.गो.बर्वे मार्ग कुर्ला पूर्व व कुर्ला पश्चिम रस्त्याच्या पीछेहाट बाबत माझ्या स्तरावरून झो.पु.प्रा. व महानगरपालिका यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू आहे. मा. आयुक्त यांनी महानगर पालिकेस आगाऊ ताबा घेण्याचे निर्देश दिले होते यावर अद्याप एल विभागाकडून कोणत्याही प्रकारचे ताबा घेतलेला नाही. तातडीने कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक असून यामुळे कुर्ल्यातील वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लागेल.
• कुर्ला सॅटिस प्रकल्पा अंतर्गत कुर्ला पूर्व बस स्थानकाच्या बेस्ट चा भूखंड आणि बाजारचा आरक्षण असलेला भूखंडाचा एकत्रित पुनर्विकास करून कुर्ला रेल्वे स्थानकांच्या पूर्वे कडील भागास सुधारणा करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
• पूर्व द्रुतगती मार्गावर चुनाभट्टी ते एव्हरार्ड नगर येथील भुयारी मार्गाची जीर्ण अवस्था असल्याने या ठिकाणी मी पादचारी पूल बांधण्याचा प्रस्ताव केला आहे. सदर ठिकाणी पूल विभागास मा. उप आयुक्त परिमंडळ ५ यांनी तांत्रिक बाबी तपासून पुलाची आवश्यकता तपासण्याचे निर्देश दिले होते. सदरहू भुयारी मार्गातून सुमारे १०००० ते २०००० हजार नागरिक रोज ये-जा करत असतात या कारणास्तव पुलाचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी हि विनंती.
• चुनाभट्टी फाटकाच्या वरुन प्रस्तावित असलेल्या पुलाच्या कामाच्या अनुषंगाने महानगरपालिका विकास नियोजन विभागामार्फत जागेचे हस्तांतरन होऊन एल विभाग परिरक्षण मार्फत तातडीने कार्यवाही करून पूल विभागाकडून पुढील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात ह्वावी हि विनंती.
• प्रस्तावित माहूल पर्जन्य जल उदंचन केंद्र बृहन्मुंबई महानगर पालिकेने जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडे प्रलंबित आहे असे सांगण्यात आले होते सद्यस्थिती हि प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे. या उदंचन केंद्राच्या कामाने विभागातील मान्सून काळात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल.
• शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या (कलेक्टर लँड) हस्तांतरण (फ्री-होल्ड) म्हणजेच जमिनीचा धारणाधिकार रूपांतरण करण्याकरिता दि ८ मार्च २०१९ च्या अधिसूचनेनुसार असलेला शुल्क बाजारमूल्यावर १० -१५ % आहे. परंतु सदर शुल्क ५ % झाल्यास जीर्ण झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल.
• शासनाने PWR -२१९ ह्या योजने अंतर्गत SC/ST/NT समाजाला जमिनींना प्रदान केल्या आहेत. ह्या योजनेंतर्गत असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना जिल्हाधिकारी कार्यालात असे सांगण्यात येते कि फ्रीहोल्डची दि ८ मार्च २०१९ च्या अधिसूचनेत PWR – २१९ योजनेबद्दल काही उलेख नसल्यामुळे त्यांना ह्या योजनेत भाग घेता येत नाही. जर कि PWR-२१९ योजने अंतर्गत ज्या जमिनी प्रदान केल्या आहेत त्यांना पण फ्रीहोल्डच्या योजनेत भाग मिळाल्यास रहिवाश्यांना दिलासा मिळेल.
• माझ्या कुर्ला विधानसभा क्षेत्रात मातृदुग्धशाळेचि सुमारे १६ एकर जागा मेट्रो २ बी साठी काही प्रमाणात बाधित होत असून त्याच्या व्यतिरिक्त असलेल्या जागा हि अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरित होणे बाकी असून मुंबई पूर्व उपनगरात कोठेही क्रीडा संकुल नसल्याने त्यावर अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत क्रीडा संकुल उभारण्यात यावेत अशी मागणी मी २०२१ पासून करत असून अद्याप क्रीडा विभागास संबंधित भूखंडाबाबत संबंधित दुग्धविकास विभागाकडून माहिती प्राप्त होत नसल्याने सदरहू प्रस्ताव प्रलंबित आहे.
• कुर्ला पूर्व व पश्चिम भुयारी मार्ग कामाकरिता बंद केलेला असून त्याला सुरु करून महानगरपालिकेकडून हस्तांतरित करून घेण्याची आवशक्यता आहे.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख, आमदार
शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद