मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  श्री राजेंद्र क्षीरसागर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र क्षीरसागर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय श्री राजेंद्र क्षीरसागर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस ज्येष्ठ समाजसेविका सौ. मेधा पाटकर ताई व रहिवासी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये कुर्ला नागोबा चौक तसेच कसाईवाडा या डोंगराळ भागातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रहिवाशांना पर्यायी घरी मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
शासनाने प्रदान केलेल्या जमिनी वरील म्हणजेच कलेक्टर लँड वरील गृहनिर्माण संस्थाच्या सभासद हस्तांतरण कुर्ला शिवसृष्टी येथील प्रलंबित असलेले प्रस्तावनाबाबत चर्चा केली, याप्रसंगी माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश दिले.