खालील मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त यांनी दिले.

कुर्ला स्थानकावर प्रस्तावित असलेल्या सॅटिस प्रकल्पाबाबत प्रमुख अभियंता (पूल), बेस्ट आणि महानगरपालिकेचे वास्तुविशारद यांचे समन्वय साधून आराखडा मान्य करून पुढील कामास सुरुवात करण्याबाबत.

चुनाभट्टी फाटकाच्या वरुन प्रस्तावित असलेल्या पुलाच्या कामाच्या अनुषंगाने रोड लाईन मध्ये बदल करून नवीन आराखडा मान्य करून पुढील कामा करिता सहकार्य करावे हि विनंती.

एव्हरार्ड नगर भुयारी मार्ग ची अवस्था जीर्ण झाली असून ठीक टिकण वरून पाणी गळती होत आहे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरीही हा भुयारी मार्ग बंद करून या ठिकाणी पादचारी पूल प्रस्तावित करण्याबाबत.